विजेचा प्रश्न सोडवताना.

आरोग्य शिबिरात सहभाग.

थंडीपासून रक्षणासाठी ऊबदार ब्लॅंकेट वाटप.

शॉर्ट सर्किट घटनेतील कुटुंबियांना मदत.

देवगाव येथील वाघेपाडा येथील दिनेश गावीत यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन घरातील सर्व तांदुळ जळून गेले.त्यांची भेट जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे यांनी भेट घेतली व त्यांना मदत.

जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे यांनी श्री.बबन काकरा काका यांचे जेष्ठ बंधू यांच्या कूटूंबाची सात्वनपर भेट घेतली.

रोजगार सेवाका बरोबर झालेल्या कामाची माहिती घेताना.

विविध शाळेला भेटी देऊन तिथल्या समस्या जाणून घेताना.

नळ योजना.

ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न.

अभिजात मराठी साहित्य संघाची काव्य मैफिल.

वाचनालय.

संविधान प्रशिक्षण शिबिर

गातेस बु. येथील पथ दिव्यांचे उदघाटन

जि.प.सदस्या शिवजयंती कार्यक्रमामध्ये जोगमार्गेपाडा येथे

शिवजयंती निमीत्त बिलावली येथे आरोग्य शिबीराचे उद् घाटन डाँ.भाई वलटे व जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे यांच्या हस्ते करण्यात आले.

जाळे (गावितपाडा ) फवारणी यंत्र मिळवून दिले

अवचितपाडा, गोळेघर येथील बंद पडलेली बोरिंग रिपेरिंग करण्यात आली

१७ गावे नळपाणी योजनेसाठीच्या पाण्या प्रज्वल भोईर यांना मदत केली.

पाहुणीपाडा येथील बंद पडलेली बोरिंग रिपेरिंग करण्यात आली

शिक्षण परिषद केंद्र आबिटघर

25th फेब्रुवारी 2022 झालेल्या आंदोलनात सहभाग

ग्रामपंचायत कुयलू येथील ग्रामस्थाकडून स्वागत

जिल्हा परिषद शाळा तिळगाव येथे सदिच्छा भेट ,मार्गदर्शन !!!!!

आस्था फाऊंडेशन तर्फे महीला दिनानिमीत्त कूडूस येथील कार्यक्रमात जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे

अमृत आहार वाटपावेळी विजयपूर येथे जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे

पंचायत समिती कार्यालय,पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय ई.ठिकाणी भेटी देऊन महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला

18व्या जंप रोप स्पर्धा 2022 मध्ये जिल्हा परिषद शाळा मेघवाले पाडा (कोणसई )येथील 12 वर्षाखालील 6 मुलांनी गोल्ड मॅडल जिंकले असून त्यांचा कौतुक सत्कार जिल्हा परिषद सदस्य सौ.भक्ती वलटे मॅडम , डॉ. भाई वलटे सर.

चंदवली येथील रस्त्यांच्या कामाचे उद् घाटन जि.प.सदस्या सौ.भक्ति भाई वलटे यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत पाड्यावरील मुलांची सुवर्ण कामगिरी

सौरऊर्जा संच उदघाटन आणि हस्तांतरण कार्यक्रम

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबई येथील घरावर भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पालघर जिल्हा यांच्याकडून ठीकठीकाणी निषेध आंदोलन करण्यात आली.

सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेकडून जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे व डाँ.भाई भागोजी वलटे या उभयतांचा आज सत्कार करताना मानवाधिकार परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा (महीला विभाग) सौ.आर्चना कदम मँडम व उपाध्यक्ष श्री.मोहन ठाकूर

देवगाव नारळीपाडा येथील नागरीकांची पूरहानीमध्ये रस्ता तुटल्यामूळे पावसाळ्यात येण्याजाण्यासाठी रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.त्यासाठी पाठपुरावा करुन साकाव व डांबरी रस्त्यासाठी जि.प.सदस्या सौ.भक्ती वलटे व आमदार साहेबांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला.त्याकामी आज जि.प.सदस्य व प.स.सदस्य यांनी इंजीनिअर समवेत रस्त्याची पाहाणी केली

चिखले येथे करदंची पाणी याठिकाणी गावकऱ्यांच्या मागणीवरुन बंधारा बांधकामाकामी जागेची पाहाणी व मोजमाप करण्याकामी जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे यांनी इंजिनीअर व गावकर्यांसमवेत प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली

कांबारे व आबिटघर येथील obc मिटिंगमध्ये मार्गदर्शन करताना

शाळा दुरुस्ती Estimate बनवण्याकामी ज्यू.इंजिनीअर सोबत शाळांची पाहाणी करताना जि.प.सदस्या सौ.भक्ती भाई वलटे. जिल्हा परिषद शाळा सावरखांड,देवगाव व काकडपाडा

देवळी येथील हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

१ मे जागर वाडा तालूका पञकार संघातर्फे आयोजित कार्यक्रम

जव्हार येथील तालूका कार्यकारणी मिटींगमध्ये

पी.जे. हायस्कूलच्या के.डी.गंधे सभागृहामध्ये  अभिजात मराठी साहित्य सेवा संघाचा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखक डाॅ. श्रीदत्त राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. नितीन मोकाशी उपस्थित होते १) परशुराम सावंत सर  - समाजरत्न पुरस्कार ;
२) डाॅ. मिठाराम कडव (खोडाळे) ,- सेवारत्न पुरस्कार;
३) हेमांगी पाटील  -  नारीरत्न पुरस्कार;
४) नम्रता माळी (पालघर)  - साहित्य सेवारत्न पुरस्कार;
५) हरेश पाटील  - क्रिडारत्न पुरस्कार;
६) निलेश गोतारणे  - शिक्षकरत्न पुरस्कार;
७) शशिकांत कासार (tv9)  -  आदर्श पत्रकार पुरस्कार ;
८) स्वप्नील घरत (पालघर) - कलारत्न पुरस्कार;
९) दिपक शनवारे  - कृषीरत्न पुरस्कार;
१०) भक्ती वलटे (जि.प.सदस्या पालघर)  - 
आदर्श लोकप्रतिनिधी लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

त्याप्रसंगी डाँ.भाई वलटे यांनी व्यक्त केलेले मनोगत...
नमस्कार ,
आजचा हा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने अबिटघर गटातील सर्व सुजान मतदारांचा आहे ज्यांनी आम्हाला लोकप्रतिनीधी म्हणून काम करण्याची संधी दिली व वेळोवेळी ते आमच्याकडून काम करुन घेत आसतात......कोणत्याही क्षेञात काम करीत असताना त्या क्षेञातील पुरस्कार मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.परंतु आम्हाला हा पुरस्कार खुपच लवकर मिळाला....आयोजकांच्या दृष्टिने त्यांनी त्याची निवड योग्य केली असेलही....आम्ही आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो... ..परंतू मी ह्या क्षेञामध्ये नविनच आहे व लगेचच पुरस्कार मिळणे म्हणजे जबाबदारी वाढणे...कदाचित् पुरस्काराने आपले काम थंडावायला नको ही भिती कूठलाही पुरस्कार स्विकारताना मनात येत आसते.....हाच पुरस्कार आपला कार्यकाल संपताना आपल्या कार्याच मुल्यमापन करुन झाल असत तर अजून आनंद झाला असता....परंतु ह्या पुरस्काराने भारावून न जाता जेथे-जेथे माझ्या कामात मरगळ येईल तेथे नक्कीच ह्या पुरस्काराची आठवण करुन नव्या जोमाने कामाला लागेल...भविष्यातील वाटचालीसाठी हा पुरस्कार आम्हाला प्रेरणादाई ठरेल ही आपेक्षा करतो.. असेच सर्व मतदारांनी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी....जेणेकरुन आपल्या मतदारसंघाची सेवा करता येईल व मतदार संघाचे नाव उज्ज्वल करता येईल...तरी हा पुरस्कार मी अबिटघर गटातील सर्व मतदारांना समर्पित करीतो.
आजच्या या प्रसंगी आभिजात मराठी साहीत्य सेवा संघाच्या प्रथम वर्धापण दिनानिमीत्त व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा
मी महेश पवार गातेस खु...
मार्च महीन्यामधील घटना घरकूलांची यादी बनवून झाली.व माझे नाव सदरच्या यादीतून कोणत्या कारणास्तव वगळण्यात आले मला समजले नाही.माझ्या घराची आवस्था खुपच वाईट होती मोडकळीस आलेले घर कधी पडेल याची शाश्वती नव्हती...माझ नाव यादीत नाही हे कळल्यावर मला फार वाईट वाटले..आता काय कराव विचारात होतो आणि आठवण झाली आपण डाँक्टरांना भेटू आपल्याला काहीतरी मार्ग निघेल...म्हणून मी त्यांना व मँडमला भेटलो...त्यांनी मला बरोबरा घेवून तात्काळ पंचायत समिती घरकूल विभाग गाठल..व तेथील कर्मचाऱ्यांनबरोबर संवाद साधला......लगेचच माझ्या घराची पाहाणी करण्यात आली व खरोखर मला घराची गरज आसल्याच त्यांच्या लक्षात आल...त्यांनी सतत तिन-चार दिवस स्वतः माझ्या उपरोक्त जावून पाठपूरावा करुन माझ घरकूल मंजूर करुन घेतल....त्या दरम्यान मला दोन ते तिन वेळा स्वतः फोन करुन वेळोवेळी मला सदरच्या प्रकरणाच status स्वतः त्यांनी कळवल..... अखेर मला शबरी आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झाल... व आजरोजी माझ घर पूर्णत्वाच्या वाटेवर असुन ...काही अडचण असल्यास मी वेळोवेळी डाँक्टरांची प्रत्यक्ष भेट घेवून किँवा फोनवर अडचण सांगतो तेव्हा ति अडचण दूर होते...आम्हा गरीब लोकांना एक हक्काचा माणूस मिळाला एवढच सांगेन.................
धन्यवाद डाँक्टर व जि.प.सदस्या भक्तीताई वलटे मँडम..

स्वप्न साकार नवतेजस्विनी गोट बँक वाडा

आज दि. 22/6/2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील कतृत्ववान महिलांना 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' देवुन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान सोहळा आज 'बालगंधर्व रंगमंदिर' पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात जेष्ठ विचारवंत मात्र. डॉ. आ. ह. साळुंखे, खासदार फौजीया ताई खान, खासदार सौ. वंदना ताई चव्हाण, महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश विद्याताई चव्हाण, मुख्य समन्वयक सुरेखा ताई ठाकरे महिला आयोग अध्यक्ष सौ. रुपाली ताई चाकणकर,विभागीय अध्यक्षा पालघर ठाणे ॠताताई आव्हाड,जेष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे, पुणे जिल्हा समन्वयक वैशाली ताई नागवडे, भारती ताई शेवाळे,बारामती जिल्हा समन्वयक वनिता ताई बनकर ,ठाणे जिल्हा समन्वयक विद्याताई वेखंडे,पालघर जिल्हा समन्वयक निलम राऊत,नवी मुंबई समन्वयक मनिषा देसाई, शहापुर तालुका समन्वयक रंजीता दुपारे,वाडा तालुका समन्वयक भक्ती ताई वलटे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकते व महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आज दि.2/8/2022 रोजी डोंगरपाडा व भूजडपाडा नेहरोली येथे वह्या वाटप कार्यक्रम पार पडला. मा.सौ.भक्तीताई वलटे जि.प.सदस्या मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा आब्जे या शाळेत मुलांना वह्या व खाऊ वाटप . कार्यक्रम
आज दिनांक-03/10/2022 रोजी edu smart शाळा वाडा यांच्या वतीने आयोजित नारी सन्मान पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण सावंत सरांसोबत जि. प. सदस्या भक्ती वलटे
कांबारे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माळीपाडा जाधवपाडा नडगेपाडा येथे चिराग फाऊंडेशन अंतर्गत पाणी योजनेच आज भुमिपुजन करण्यात आलं . भुमिपुजनासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार मा दौलतजी दरोडा साहेब, जि प सदस्या सौ भक्ती ताई ,ड्रॉ भाई वलटे , पंचायत समिती उपसभापती श्री जगदशिजी पाटील, फॉरेस्ट ऑफिसर , कांबारे ग्रांमपचायत सरपंच प्रियांका जाधव व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
मा. जि. प. सदस्या भक्तीताई वलटे, उपसभापती मा. जगदीश पाटील साहेब, मा. सरपंच तीळगाव -देवगाव पुष्पाताई धूम यांच्या हस्ते खुपरी देवगाव तीळगाव आबीटघर रस्त्यावरील पाईप डीप पुनरबांधणी कामाचे उदघाटन झाले 🌹🌹

सावरखांड गावातील चिरग फाऊंडेशन पाणी योजना साठी गावकरी श्रमदानुन बोरींग मारली खुप पाणी लागले अभिनंदन सावरखांड गावकरी 💐💐💐💐💐🙏👍🏻👍🏻

आज मा. जि. प. सदस्या वलटे मॅडम, मा. उपसभापती जगदीश पाटील साहेब यांनी काटी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शालेय स्वच्छता पाहून आनंदी झाले व शाळा उत्कृष्ट असल्याचे सांगून शिक्षक व विद्यार्थ्याचे कौतुक केले.
शिवाजी राजे विचारमंच देवळी आयोजित टेनिस क्रिकेट सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी मान्यवरांसोबत जि. प. सदस्या भक्ती वलटे व डॉ. भाई वलटे.
आज दि.9/2/2023 रोजी जागरूक पालक सुदृढ बालक अभियान 0 ते 18 वर्षापर्यंत बालके व किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी अभियान अ. ल. चंदावरकर हायस्कुल खनिवली येथे संपन्न झाला त्याप्रसंगी जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे.....
HSC व SSC परीक्षा 2023 कॉपी मुक्त अभियान राबविण्यासाठी घेण्यात आलेल्या मिटिंग मध्ये जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे.....
जि. प. सदस्या यांच्या 15 वित्त आयोग फंड 2021-22 निधीतून थाळेकर पाडा आब्जे येथील पेवर ब्लॉक रस्त्याचे उदघाट्न दि.22/02/2023 रोजी जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे यांच्या हस्ते सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आब्जे यांच्या उपस्थित पार पडला.
जि. प. सदस्या भक्ती वलटे यांच्या विशेष प्रयत्नातून आलेल्या खैरे-आंबिवली येथील उपकेंद्राचे भूमिपूजन जि. प. सदस्या भक्ती वलटे, ग्रामपंचायत खैरे सरपंच सौ. मंगला गावित मॅडम, उपसरपंच श्री. पंढरी पाटील साहेब, सदस्य अल्पेश पांडव, भास्कर गावित, प्रतिभा सवर ग्रामसेवक चंदू ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ग्रामस्थ पुंडलिक देशमुख, मधुकर देशमुख, शेखर देशमुख, घनश्याम भानुशाली, गोविंद पवार,सागर गुरुडे व इतर ग्रामस्थ हजर होते.
२७ फेब्रुवारी २०२३ मराठी भाषा गौरव दिवस व कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत वि.वा. शिरवाडकर जयंती निमित्त ज्ञान दान रक्षण 'कुडूस विभाग शिक्षण सेवा संघाचे 'शारदा विद्यालय नेहरोली येथे मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास शारदा विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मा.सौ.भक्तीताई वलटे जि.प.सदस्या पालघर यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी आपली भाषा वाचली ऐकली,लिहिली बोलली पाहिजे इतर भाषा आल्या पाहिजेत पण मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे.या कार्यक्रमास मा.श्री.डाॅ.भाई वलटे, नेहरोली गावचे उपसरपंच मा.श्री.प्रथमेश ठाकरे,मा.श्री.आतिश पाटील,मा.श्री.नितिन शिंदे,शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.एन.डी.मोरे सर, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पेहराव करून कार्यक्रमाची शोभा वाढवली ग्रंथदिंडीचे नियोजन करणारे श्री.रमेश पवार सर कलाशिक्षक यांनी मुलांना आपण इंग्रजी शब्द सर्रास वापरतो त्यांचे मराठीतील शब्द विचारून विद्यार्थ्यांनमध्ये उत्सुकता व चैतन्य निर्माण केले.प्रा.ललित पाटील,श्री.चोरमुले,श्री.वाघ सजावट काम करणारे सौ.स्वाती पाटील, चव्हाण, मंजिरी मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन श्री.उत्तम जाधव सर यांनी केले.
सावरखांड येथील लघुनालपणी योजनेची पाहणी करताना जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे
जागतिक महिला दिना निमित्त जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे व चिराग फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावरखांड येथे कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला.
स्त्री शक्ति नारिस त्रिवार मानाचा मुजरा👏👏👏 जागतिक महिला दिनानिमित्त आज मौजे सावरखांड येथे मोठ्या थाटा माटात पार पड़ला या प्रसंगी जि.प,, सदस्या मा . सौ: भक्ति भाई वलटे मॅडम . डॉ. भाई वलटे सर. प्रविण .सोनावणे . सर . चिराग फाउंडेशन . ऋषाली मॅडम ग्रा. सदस्या . सुरेखा उंबरसाडा . राजेश बाबर . प्रसाद पाटील सर आदि मान्यवर व तमाम महिला वर्ग उपस्थित होते या प्रसंगी मा, भक्ति वलटे मॅडम . डाँ भाई वलटे सर . ऋषाली मॅडम यांच्या निवेदनातून महिलांना मोलाच मार्गदशन केल . तसेच महिलांनी विविध कार्यक्रमात भाग घेउन आपल कला र्कौशल्य दाखविले, एकंदरित . सात स्पर्धा पार पाडण्यात त्या मध्ये . त्या मध्ये पाहिला क्रमांक पटकविनाऱ्या माहिलेस पैठणी साड़ी व इतर महिल्यांना आकर्षक भेट वस्तु देण्यात आल्या . डॉ भाई वलटे सर व भक्ती वलटे मॅडम आपणा सर्वांचे मी आभार मानतो कारण तुमच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला .💐💐💐💐💐 👏शुभेच्छुक👏👏 राजेश बाबर ( सदस्य ) ग्रु ग्रा चिखले ' सावरखांड ' गोळेघर
आज दि.10/03/2023 रोजी जि. प. शाळा पलसपाडा येथील स्नेहसंमेलनातं प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे.
खनिवाली स्पर्धा
मा.सौ.भक्तीताई वलटे मॅडम जि.प.सदस्या,मा.श्री.जगदीशजी पाटील साहेब पं.स.वाडा उपसभापती,मा.सौ.प्रियांका जाधव मॅडम सरपंच कांबारे तसेच मा.डॉ.श्री.भाई वलटे साहेब यांची जि.प.कांबारे शाळेला भेट संपाविषयी चौकशी, विद्यार्थी गुणवत्ता तपासणी,शालेय अभ्यासक्रम कसा शिकविणार या विषयी मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या.सर्वांचे आभार व धन्यवाद.🙏🌹🙏
आज दि.25/03/2023 रोजी मौजे -कडवपाडा कांबारे येथे वॉटर फिल्टर व सौरऊर्जा ब्लब चे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जि. प. सदस्या भक्ती वलटे...
सध्या परिस्थितीत प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य ऐकायला मिळते ते म्हणजे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे सर्व एकाच मालेचे मणी असतात मग तो आमदार असो किंवा खासदार असो जि प सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो किंवा आपल्या स्थानिक पातळीवरचा सरपंच असो हे सर्व मात्र जनतेचे कुठलेही काम न करता केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी राजकारणात उतरतात आणि अशा लोकांच्या वागण्यामुळे आज लोकप्रतिनिधींवर कुणाचाही भरोसा राहिलेला नाही परंतु आज मात्र आम्हाला याच्या विपरीत परिस्थिती अनुभवला मिळाली ती म्हणजे आमच्या अबीर घर गटातील माननीय जि प सदस्या श्री भक्तीताई वलटे यांनी मात्र आज सिद्ध करून दाखवलेला आहे की एक जि प सदस्य यांनी जर मनावर घेतलं तर ते जनतेचे किती काम करू शकतात हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवले आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आमचा उडालेला विश्वास बसला आहे तो केवल माननीय जि प सदस्य भक्तीताई वलटे यांच्या कार्यामुळे खरं सांगायचं झालं तर आज पर्यंत आमच्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी कधीच पोहोचला नव्हता किंवा आमच्या समस्या सुद्धा त्यांनी कधी जाणून घेतल्या नव्हत्या परंतु असं पहिल्यांदाच घडतय की आमच्यापर्यंत कुठलातरी लोकप्रतिनिधी आला आणि त्यांनी आमच्या समस्या आम्हाला विचारल्या आणि त्या पूर्ण सुद्धा केल्या भक्ती ताई वलटे तसेच भाई वोल्टे साहेब हे प्रत्येक गावातील किंवा खेडोपाड्यातील चार पोरांना तरी ओळखतात हे मात्र मी पहिल्यांदा पाहतोय असे कधीच घडले नव्हते आज मात्र आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की आज गावागावातून खेड्या खेड्यांमध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव ऐकायला मिळतं ते म्हणजे माननीय जि प सदस्या भक्तीताई बोलते ही खरी त्यांच्या कार्याची पोचपावती आहे त्यांनी आमच्या माळीवाडा गावांमध्ये खूप सुंदर चिराग फाउंडेशनच्या मार्फत योजना राबवण्यात सुरुवात केली आहे या योजनेतून चिराग फाउंडेशन यांनी प्रत्येक कुटुंबाला सोलर लॅम्प तसेच स्ट्रीट लाईट आणि शुद्ध पाणी पिण्यास मिळावे म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक फिल्टर दिले चिराग फाउंडेशन या संस्थेला आणण्यात भक्तीताई वलटे तसेच भाई वलटे साहेब यांचा खारीचा वाटा आहे केवळ त्यांच्या सहकार्यानेच चिराग फाउंडेशन सारखी संस्था आमच्यापर्यंत पोहोचली देवाकडे एकच आम्ही सर्व गावकरी विनंती करू इच्छितो की याच्याही पुढे आम्हाला असाच लोकप्रतिनिधी लाभावा
जि. प. सदस्या भक्ती भाई वलटे यांच्या प्रयत्नातून जि. प.15 वित्त आयोगाच्या 2021-22 च्या निधीतून आलेल्या कुयलू कातकरी वाडी येथे लघु नळ पाणी पुरावठा योजनेच्या कामाचे उदघाटन मा. जि. प. सदस्या भक्ती वलटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या योजनेकामी उषा विनोद वाघ यांनी बोरवेल साठी जागा उपलब्ध करून दिली.त्याप्रसंगी सरपंच श्री. श्याम भवर साहेब, उपसरपंच सौ. गौतमी गोतारणे, ग्रामसेवक ग्रामपंचायत कुयलू, ग्रामस्थ अमोल गोरे, शरद सवर, विनोद हरड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा. प. सदस्य भक्तीभाई वलटे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना
दि.15/06/2023 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नावागतांचे स्वागत करताना जि. प. सदस्या भक्ती वलटे, रोहिणी शेलार, अक्षता चौधरी.
गातेस बु येथे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना जि. प. सदस्या भक्ती वलटे.....
दिगंत फाउंडेशन व रोटरी क्लब तर्फे गातेस खु येथे लिफ्ट इ्रीगेशन सोलर सिस्टिम बसाविण्यात अली. सदरच्या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी जि. प. सदस्या भक्ती वलटे....
मा. सौ. भक्तीताई वलटे व मा. डॉ. वलटे यांच्या मार्गर्शनाने व सहकार्याने ग्रुप ग्रामपंचायत तिळगाव कार्यक्षेत्रातील देवगाव येथे शबरी योजने अंतर्गत पुढील ग्रामस्थांना घरकुले मिळाली. १) श्री.जयराम गणपत गवारी २) श्री.हरेश्वर प्रकाश गावित ३) श्री.मिलिंद सुभाष धुम म्हणुन वलटे दांपत्याचे मनःपूर्वक खुप-खुप आभार.🙏🙏🙏💐💐💐
जि प सदस्या सो भक्तीताई वलटे मॅडम यांच्या खास प्रयत्नातून चिखली ग्रामपंचायत मधील स्थानिक रहिवासी श्री दिलीप पांडुरंग माढा तसेच सीता सिताराम माढा आणि दीपक वैजल अशा तिघांना शबरी योजनेतून घरकुले मंजूर करून दिली तरी मी या सर्वांचे वतीने सो भक्तीताई वलटे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि यापुढेही अशाच गरजू व्यक्तींसाठी कार्य करत रहावे हीच इच्छा व्यक्त करतोय पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय धन्यवाद
कोणसई येथीलश्री.दीपक सुरुम याला शबरी योजनेतून भक्ती वलटे मॅडम यांच्या प्रयत्नांनातून घरकुल योजनेचा लाभ धन्यवाद मॅडम, आणि डॉ. साहेब 🙏🙏
आज दि.13/07/2023 रोजी 10 व 12 च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आबिटघर हायस्कुल मध्ये श्री. दिलीप पाटील सर आबिटघर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. चिराग फाऊंडेशन च्या अध्यक्षा प्रतिभा पाई मॅडम, आरोहन फाऊंडेशन चे CEO अमित नारकर साहेब, एकलव्य ट्रस्ट गारगाव चे केंद्रप्रमुख अमित पाटील साहेब,रोहिणी शेलार सभापती महिला बालकल्याण जि. प. पालघर, जि. प. सदस्या भक्ती वलटे, तेजस भोईर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, विजय औसरकर, नामदेव साबळे सर जेष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस,प्रदीप खैरकर, समीर ठाकरे चाणक्य अकाडमी, रामदास कदम सरपंच कोने, प्रियांका जाधव सरपंच कांबारे, पुष्पा धुम सरपंच तिळगाव,मंगला गावित सरपंच खैरे -आंबिवाली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी समीर ठाकरे चाणक्य अकाडमी यांच्याकडून अजय गुरुनाथ हांडवा सोनाळे हायस्कुल या अनाथ विद्यार्थ्यांची 11 व 12 विच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून 10 विच्या विद्यार्थ्यांना 25 अभ्यासिकेचे सेट देण्यात आले.तसेच श्री. विलास सातवी चिखले व माऊली प्रिंटिंग प्रेस चे मालक राहुल वेखंडे वाडा यांच्याकडून सावरखांड येथील अनाथ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
सर्कल व तलाठी कार्यालय कोने चे उदघाट्न आज दि.१५/०८/२०२३ रोजी करण्यात आले. सदरच्या इमारत नूतनीकरणा साठी जि. प. सदस्या भक्ती वलटे यांनी विशेष प्रयत्न केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक-02, प्रादेशिक कार्यालय जव्हार, उप प्रादेशिक कार्यालय मोखाडा, अंतर्गत आधारभूत खरेदी केंद्र, सारशी, ता. वाडा (तुसे आदिवासी संस्था), जि. पालघर....... येथे महाराष्ट्र राज्य, कृषीभूषण, मा. श्री. अनिल नारायण पाटील, सांगे व जि. प. सदस्या सौ. भक्ती भाई वलटे .. यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा आज पार पाडण्यात आला. त्यावेळची काही क्षणचित्रे......💐💐🌹🌹
नडगेपाडा-२ कांबारे येथे समाजकल्याण विभाग जि. प. पालघर अंतर्गत जि. प. सदस्या भक्तीताई भाई वलटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आज जि. प. सदस्या भक्तीताई भाई वलटे, प्रियांका जाधव सरपंच कांबारे, सुनीता शिवराम भोईर, रोहिणी नडगे ग्रा. प. सदस्या, जेष्ठ कॉ. शांताराम नडगे काका, डॉ. भाई वलटे, महेश भोईर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
मा. जि. प. सदस्या भक्तीताई भाई वलटे यांच्या १५ वित्त आयोग जि. प. स्तर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघर मधून ग्रामपंचायत खूपरी अंतर्गत गडगपाडा येथे लघुनलपाणी योजनेचे उदघाट्न मा. जि. प. सदस्या भक्तीताई वलटे यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी मा. किशोर पवार सरपंच ग्राम पंचायत खूपरी, सौ. प्रीती पाटिल उपसरपंच ग्रा. खूपरी, चौधरी मॅडम, शेळके मॅडम, संजय जाधव, नामदेव तल्ला, अजय ठाकरे सदस्य ग्रामपंचायत खूपरी तसेच सदानंद पाटिल, मिलिंद पाटिल, राजेश चौधरी, मयूर पाटिल, प्रतीक पाटिल, प्रकाश रिंजड ग्रामस्थ खूपरी उपस्थितीत होते.
महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर मार्फत व जि. प. सदस्या भक्तीताई वलटे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रा. पं. खैरे-आंबिवाली येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामचे भूमिपूजन मा. रोहिणीताई शेलार महिला बालकल्याण सभापती, भक्तीताई वलटे जि.प. सदस्या, मंगला गावित सरपंच खैरे-आंबिवाली, पंढरी पाटिल उपसरपंच खैरे-आंबिवाली, अल्पेश पांडव, भास्कर गावित ग्रा. सदस्य व ग्रामस्थ खैरे-आंबिवाली यांच्या उपस्थितीत पार पडले.